शेळीची काळजी

Care image

आमची विक्री आणि सेवा

filler image

शेळी प्रजनन

शेळीपालन करताना शेळीच्या जातीची निवड, शेळी आणि करडांचे व्यवस्थापन, त्यांना होणारे आजार आणि त्यावरील उपचार तसेच व्यवसायाचे अर्थशास्त्र याबाबत माहिती असणे आवश्याक आहे.
1) शेळीपालन व्यवसायामध्ये प्रजनन व्यवस्थापन फार महत्त्वाचे आहे. शेळीचे किमान वय 8 ते 10 महिन्यांत 30 किलो झाले पाहिजे. या वेळेस शेळी पहिला माज दाखवतात; परंतु पहिले दोन माज रेतन न करता सोडून द्यावेत. तिसऱ्या माजास रेतन करावे.
2) शेळी अस्वस्थ होणे, सतत ओरडणे, शेपटी हलवणे, खाद्ये खाणे कमी करणे, योनी मार्गात चिकट स्राव दिसून येणे ही शेळीमधील माजाची लक्षणे आढळून येतात.
3) शेळीतील माजाचे चक्र दर 21 दिवसांनी येते. माजाचा कालावधी 30 ते 36 तास असतो. असे निदर्शनास आलेले आहे, की शेळीमधील स्त्रीबीज 24 ते 30 तासांत माज सुरू झाल्यानंतर होत असते. या करिता शेळीस या कालावधीमध्ये किमान दोन वेळेस रेतन करावे.
4) 25 शेळ्यांकरिता 1 नर असावा. शेळीमध्ये दोन वर्षांला तीन वेत घेतल्यास शेळीपालन व्यवसाय जास्त फायदेशीर ठरू शकतो.
5) माजाची तारीख, रेतन झालेली तारीख व इतर सर्व प्रजनन विषयी नोंदी ठेवाव्यात.
6) रेतन केल्यानंतर दोन पुढील माजाची काळजीपूर्वक पाहणी करणे, माज दिसून आला नाही तर गाभण असण्याची शक्यकता असते. वजन वाढणे व इतर लक्षणांवरून गाभणची खात्री करून घ्यावी.
7) वेळोवेळी पशुवैद्यकाकडून तपासणी करून घ्यावी. त्यानुसार शेळी गाभण असल्याची खात्री करून घ्यावी.
8) शेळीचा गाभण काळ 150 दिवस असतो.
9) गाभण शेळ्यांचे व्यवस्थापन वेगळे करावे. गाभण शेळ्यांना संतुलित आहार, हिरवा व वाळलेला चारा, स्वच्छ पाण्याचा वेळेवर पुरवठा करावा. वेळोवेळी आरोग्याची काळजी घ्यावी. योग्य काळजी घेतल्याने सशक्त करडे जन्मतात.
10) शेळी व करडांना औषध उपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.

शेळ्यांचे व्यवस्थापन

1. शेळयांच्या संख्येच्या ३ ते ४ टक्के पैदाशीचे बोकड ठेवावे म्हणजेच २५ ते ३० शेळयांना १ बोकड हे प्रमाण ठेवावे.
2. दर दोन वर्षांनी शेळयामधील बोकड बदलावा म्हणजे समरक्त पैदास टाळून सशक्त करडे जन्माला येतील.
3. गाभण / दुधाळ शेळयांना आणि पैदाशीच्या बोकडांना पैदास काळात त्यांच्या वजनानुसार अतिरिक्त हिरवाचारा, वाळलेला चारा व खुराक देण्यांत यावा.
4. सर्व शेळयांना नजिकच्या पशुधन विकास अधिका-यांच्या सल्ल्याने लसीकरण आणि जंतप्रतिबंधक औषधोपचार नियमितपणे करावा.
5. गोचीड, उवा इत्यादी बाहय किटकांच्या प्रतिबंधासाठी किटकप्रतिबंधक औषध फवारणी करावी.
6. शेळयांचा विमा उतरविण्यांत यावा.
7. एखादी शेळी आजारी/मृत पावल्यास तात्काळ नजिकच्या पशुचिकित्सालयासी संपर्क साधावा. तीची परस्पर विल्हेवाट लावू नये.
8. शेळयासाठी योग्य आकाराचा स्वस्त निवारा करावा आणि त्याची स्वच्छता ठेवण्यांत यावी.
9. शेळयांना दररोज आवश्यकतेनुसार दोनदा स्वच्छ आणि थंड पाणी देण्याची व्यवस्था करावी.

विविध जातोच्या शेळी / बोकड पैदास

मांसासाठी व दूधासाठी उत्तंम जातीच्या् शेळ्या खालीलप्रमाणे उस्मानाबादी- अर्धबंदीस्त् शेळीपालनासाठी उपयुक्तम[मांसासाठी] संगमनेरी – अर्धबंदीस्तश शेळीपालनासाठी उपयुक्तप[मांसासाठी व दूधासाठी] सिरोही – अर्धबंदीस्तश शेळीपालनासाठी उपयुक्तप[मांसासाठी व दूधासाठी] बोएर – बंदीस्तध शेळीपालनासाठी उपयुक्तप[मांसासाठी] सानेन- बंदीस्तध शेळीपालनासाठी उपयुक्तप[दूधासाठी] कोकण कन्याळ: अर्धबंदीस्तस शेळीपालनासाठी उपयुक्तम[मांसासाठी]


filler image

शेळीपालन कसे करावे

बंदीस्त शेळीपालन –
शेळयांची चरण्याची पध्दत इतर गुरांप्रमाणे म्हणजे गाय, म्हैस मेंढी, यापेक्षा वेगळी असून त्या प्रत्येक झाडाचे झुडपाचे कोवळे शेंडे खातात त्यामुळे झाडांची वाढ खुंटते या प्राण्यामुळे जंगलांचा -हास होत आहे असा सर्व साधारण समज आहे व तो काही प्रमाणात खराही आहे जर आपण शेळयांना जंगलात चरण्याकरीता न सोडता त्यांचे बंदिस्त संगोपन केले तर त्यांची झपाटयाने वाढ होते.
अर्धबंदीस्त शेळीपालनाची आवश्यकता –
अर्धबंदिस्त शेळीपालन म्हणजे चराऊ कुरणांचे उपलब्धतेनुसार शेळ्यांना पाच ते सात तास बाहेर चारून संध्याकाळी गोठ्यात आल्यावर थोडाफार चारा तसेच पूरक आहार देऊन शेळीपालन करणे. या पद्धतीमध्ये शेळ्यांचा आहारावरचा खर्च 60 ते 70 टक्के कमी होतो. बागायती भागात जेथे चराऊ कुरणांचा तुटवडा आहे तेथे हे शेळीपालन शक्यत होते.

शेळयांच्या आहाराबाबत मार्गदर्शन व्हावे.
• हिरवा चारा : ३ ते ४ कि. प्रती शेळी, प्रतिदिन
• वाळलेला चारा : ०.७५ ते १.०० किलो
• प्रतिशेळी, प्रतिदिन.
• संतुलित आहार : २०० ते २५० ग्रॅम प्रतिशेळी, प्रतिदिन

filler image

शेलीपालानाचे फायदे

• भारतीय अर्थव्यवस्थेत शेळयांचे महत्व जगात एकंदर 620 दशलक्ष शेळया असून त्यापैकी 123 दशलक्ष शेळया भारतात आहे.
•शेळयांच्या संख्येने जरी भारत प्रथम क्रमांकावर आहे.
•देशातील दुध, मांस, व कातडीच्या एकंदर उत्पादनापैकी 3 टक्के दुध 45 ते 50 टक्के मांस तर 45 टक्के कातडी शेळयापासून मिळते.
• आपल्या देशात शेळयापासून वर्षाकाठी 2 दशलक्ष टन मांस मिळते तर पश्मिना जातीच्या शेळीपासून लोकरही मिळते.
• भारतात शेळयांच्या प्रमुख 25 जाती आढळतात आपल्याकडील जमनापरी बिंटल सुर्ती, मारवाडी, बारबेरी इत्यादी जाती दुध उत्पादनाकरिता तर बिटल, उस्मानाबादी, सुर्ती, अजमेरी, इत्यादी जाती लोकर उत्पादनाकरीता बिटल,उस्मानाबादी, सुर्ती अजमेरीइत्यादी जाती लोकर किंवा मोहेर उत्पादनाकरीता वापरतात.
• विदेषी जातीच्या शेळया उदा. सानेन, टोने, बर्ग, अल्पाईन, एम्लोन्यूबियन, अंगोरा इत्यादी सुधारित जाती फारच झपाटयाने वाढतात.
• अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार असून नराचे सरासरी वजन 100 ते 125 किलो तर मादीचे सरासरी वजन 90 ते 100 किलो असते.
• आपल्याकडे शुध्द जातीच्या शेंळया वापरावयाच्या असल्यास उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळया वापराव्या संकरित शेळया वापरल्यास अधिक उत्पन्न मिळते.


शेळी / बोकड विक्री

शेळीपालन व्यवसायात मोठ्या संधी आहेत. योग्य नियोजन केल्यास 50 ते 75 टक्के नफा या व्यवसायातून मिळतो. शेळीचा एकही भाग वाया जात नाही. मात्र चुकीच्या पद्धतींचा अवलंब केल्याने अनेक प्रकल्प बंद पडले आहे. योग्य प्रकारच्या शेळ्यांची निवड, आरोग्य, गोठ्याची रचना, प्रत्येक बाबीची नोंद ठेवणे, वाहतूकीत घ्यावयाची काळजी, आहार आणि काटेकोर व्यवस्थापन हे शेळीपालनाच्या यशाचे मुख्य सुत्र आहे, उस्मानाबादीचे 80 ग्रॅम वजन वाढते. मात्र शेळीपालनाची सुरवात करताना बोअर ऐवजी उस्मानाबादीनेच करायला हवी. बोअरचा नर दीड हजार रुपये किलो व मादी चार हजार रुपये किलो दर आहे. हे सध्या पक्त पैदाशीसाठी वापरले जातेय. आता हजार शेतकऱ्यांकडे बोअर आहेत. ते पैदास करत आहेत. मांसासाठी शेळी विकायची वेळ येईल तेव्हा ती उस्मानाबादीच्याच दराने विकावी लागेल. शेतकऱ्यांनी शेळी, बोकड नगावर न विकता जिवंत वजनावर विकले पाहिजेत. सध्या या खरेदी विक्रीत शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होते. मागणी प्रचंड असल्याने शेळी, बोकड विकला जात नाही असे होत नाही. यात्रा, जत्रा, सणांना घरोघरी बोकड कापले जातात. ही संधी ओळखून योग्य दर मिळवावा. पैदाशिसाठीच्या नरालाही चांगला दर मिळतो. सध्या पैदाशीचा नर 600 रुपये तर मटनासाठी 200 ते 300 रुपये प्रतिकिलो जिवंत वजनावर विक्री केली जाते. शेळी, बोकडाला मार्केट कुठे, कधी, कसे, कुणाला विकणार याचे नियोजन करुन व्यवसाय करावा.


गांडूळखत

गांडुळ खत - गांडुळ जीवनक्रम - गांडुळाच्या जीवनामध्ये अंडी, बाल्ल्यावस्था आणि पुर्णावस्था अशा तीन अवस्था असतात. या सर्व अवस्थासाठी ओलसर जमीन आवश्यक असते. गांडुळाचा जीवनक्रम प्रामुख्याने त्याच्या जातीवर अवलंबून असतो. पूर्ण वाढ झालेल्या गांडूळामध्ये स्त्री आणि पुरूष जनन असे दोन्हीही अवयव असतात. गांडुळ प्रत्येक सहा ते सात दिवसांनी अंडी टाकते. या अंड्यामध्ये दोन ते वीस गर्भ असतात. अंडी अवस्था हवामानाचे अनुकुलतेनुसार ७ ते २० दिवसांची असते. गांडुळाची अपुर्णावस्था दोन ते तीन महिन्याची असते. त्यानंतर तो जेव्हा पूर्णावस्थेत येतो तेव्हा तोंडाकडील २ ते ३ सें.मी. अंतरावरील अर्धा सें.मी. आकाराचा भाग जाड होतो. हे वयात आलेल्या गांडूळाचे लक्षण होय. सर्वसाधारणपणे गांडुळाचे आयुष्य दोन ते तीन वर्षाचे असते. इसिनीया फेटीडा या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या गांडुळाची लांबी १२ ते १५ सें.मी. असते. एका किलोमध्ये सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेली एक हजार गांडुळे बसतात. अशी एक हजार गांडूळे घेवून त्यांची अनुकुल वातावरणात वाढ केल्यास एका वर्षात त्यांची संख्या आठ लक्ष त्र्याएंशी हजार होते. पिले व प्रौढ गांडुळे एका किलोमध्ये दोन हजार बसतात. शंभर किलो प्रौढ गांडुळे महिन्याला एक टन गांढूळखत तयार करतात. गांडुळ संवर्धन आणि गांडूळखत निर्मीती -
१) जागेची निवड व बांधणी - गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. तसेच खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत, कारण या झाडाची मुळे गांडुळखतामधील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळखत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असल्याने त्यासाठी खालील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे छप्पर तयार करून घ्यावे. ते तयार करताना रुंदी साडेपाच मिटर, मधील उंची ३ मिटर, बाजूची उंची १ मिटर आणि लांबी गरजेनुसार म्हणजे उपलब्ध होणारे शेणखत व छप्परासाठी लागणारे साहित्य यानुसार ५ ते २५ मिटर पर्यंत असावी. छप्परामध्ये १ मिटर रुंद व २० सें.मी. खोलीचे दोन समांतर चर खोदावेत. गांडुळ खाद्य - चराच्या तळाशी ८ ते ९ सें.मी. उंचीचा किंवा जाडीचा थर काडीकचरा, पालापाचोळा, वाळलेले गवत, उसाचे पाचरट यांनी भरावा. त्यावर पाणी मारावे. याथरावर ८ ते ९ सें.मी. जाडीचा दुसरा थर कुजलेले शेणखत, लेंडीखत, सेंद्रीयखत यांचा द्यावा. त्यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे, त्यानंतर या थरावर गांडुळे सोडावीत. यावर ५ ते ६ से.मी. जाडीचा थर कुजलेले सेंद्रीयखत, शेणखत यांचा थर द्यावा. या थरावर २० ते ३० सें.मी. उंचीपर्यंत शेणखत, लेंडीखत, सेंद्रीयखत टाकावे. यावर ओले होईपर्यंत पाणि शिंपडावे. हा गादीवाफा गोणपाटाने झाकावा. दररोज या गादीवाफ्यावर पाणी शिपडावे म्हणजे गादीवाफ्यात ओलसरपणा टिकून राहील आणि गांडुळाची चांगली वाढ होऊन गांडूळखत तयार होईल. या पध्दतीने १५ ते २० दिवसात गांडूळखत तयार होते. - शेणखतामध्ये गांडुळाची वाढ उत्तम होते. त्यांची संख्या जोमाने वाढून गांडूळखत उत्तम प्रतीचे तयार होते. त्याचप्रमाणे लेंडीखत, घोड्याची लिद यापासून सुध्दा गांडूळखत तयार होते. गांडुळासाठी लागणारे खाद्य कमीतकमी अर्धवट कुजलेले असावे. शेणखत आणि सेंद्रीयखत यांचे मिश्रण अर्धे- अर्धे वापरून गांडूळखत करता येते. गांडूळामध्ये शेतातील ओला पाला-पाचोळा, भाजी पाल्याचे अवशेष, अर्धवट कुजलेले पिकांची अवशेष, साखर कारखान्यातील प्रेसमड याचा वापर होऊ शकतो. मात्र हे खाद्य गांडुळासाठी वापरताना काही प्रमाणात (एक तृतीअंश) शेणखत मिसळणे आवश्यक आहे. गांडुळखत नेहमी बारीक करून टाकावे. बायोगँस प्लँन्टमधून निघालेली स्लरीसुध्दा गांडुळखाद्य म्हणून उपयोगात आणता येते. खड्ड्यामध्ये गांडुळे टाकण्या अगोदर गांडुळखाद्यावर चार-पाच दिवस सारखे पाणी मारावे म्हणजे त्यातील गरमपणा नष्ट होईल. सुक्ष्म जीवाणू संवर्धक (बँक्टेरीअल कल्चर) वापरून खत कुजविण्याचा प्रक्रीयेस वापरावे. वरील संवर्धक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय पुणे-५ यांच्याकडे उपलब्ध होऊ शकेल. या व्यतीरीक्त गांडूळ खाद्यात एक किलो युरीया व एक किलो सुपरफॉस्फेट प्रति टन या प्रमाणात मिसळले असता कुजण्याची क्रीया लवकर होवून गांडूळखत लवकर तयार होईल.
३) गांडूळखत वेगळं करणे - गांडुळखत आणि गांडुळे वेगले करताना उन्हामध्ये ताडपत्री अथवा गोणपाट अंथरून त्यावर या गांडूळ खताचे ढिग करावेत, म्हणजे उन्हामुळे गांडुळे ढिगाच्या तळाशी जातील व गांडूळे आणि गांडुळखत वेगळे करता येईल. शक्यतो खत वेगळे करताना टिकाव, खुरपे यांचा वापर करू नये म्हणजे गांडूळांना इजा पोहचणार नाही. या व्यतीरीक्त दुसऱ्या पध्दतीप्रमाणे गादीवाफ्यावर तयार झालेला गांडूळखताचा थर हलक्या हाताने गोळा करून घ्यावा व वाफ्यावर पुन्हा नवीन खाद्य टाकावे. या गांडुळखतामध्ये गांडूळाची अंडी, त्यांची विष्ठा आणि कुजलेले खत यांचे मिश्रण असते. असे गांडुळाचे खत शेतामध्ये वापरता येते. निरनिराळ्या पिकासाठी हे खत हेक्टरी पाच टन प्रती वर्ष या प्रमाणात टाकावे.

गांडुळखताचे फायदे -
१) जमिनीचा पोत सुधारतो. २) मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो.
३) गांडुळाच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते.
४) जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
५) जमिनीची धूप कमी होते.
६) बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
७) जमिनीचा सामू (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो.
८) गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात.
९) गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामूळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात.
१०) जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत भरमसाठ वाढ होते.


आम्हाला नकाशावर पहा

काही शेळी / बोकड फोटो

संपर्क साधा

मोबाईल :
+९१ ९७६६४ ५६६८२ , +९१ ९९२२३०४६६४
इमेल: [email protected]
वेबसाईट : www.aishwaryagoatfarm.com

संपर्क पत्ता :

मु. पो देवगाव ,
तालुका - आंबेगाव ,
जिल्हा - पुणे ,
४१०५०४