आमच्या विषयी

ऐश्वर्या शेळीपालन ची स्थापना सन २०१२ साली पुणे जिल्ह्यातील आणि आंबेगाव तालुक्यातील देवगाव या ठिकाणी झाली. ऐश्वर्या शेळीपालन हि बोर , सिरोही, सोजत, जामुनापारी व सानेन शेळी / बोकड तयार करणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था आहे. आम्ही चांगले व निरोगी शेळी / बोकड ग्राहकांना देतो..

अनुभवी कामगार

आमच्याकडे अनुभवी कामगार वर्ग आहे जे शेळ्यांचे तसेच बोकडांचे योग्य प्रकारे देखभाल करतात. तसेच शेळ्यांची / बोकडांची राहण्याची जागा (गोठा) साफ करतात व त्यासाठी लागणारी सगळी सामुग्री आम्ही त्यांना पुरवठा करतो. .

चांगला गोठा

शेळ्यांना ठेवाण्यासाठी चांगला गोठा आहे. आणि आमचे कामगार वेळोवेळी ते साफ करत असतात.

निरोगी शेळी / बोकड

•आम्ही निरोगी तसेच चांगले बोकड ग्राहकांना पुरवठा करतो. आम्ही प्रत्येक चांगली कृती करतो जी त्या बोकडाला निरोगी राहण्यासाठी मदत होते. तसेच ते निरोगी राहण्यासाठी वेळोवेळी औषधे देतो. पावसाळ्यात तर आम्ही त्यांची जास्त काळजी घेतो. करड्यांना एन्टरोटॉक्सिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा प्रथम डोज 8 महिन्यांच्या वयात आणि पुन्हां 12 आठवड्याची झाल्यावर द्यावा.
• माद्यांना एन्टरोटॉक्सिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा डोज समागम काळाच्या 4 ते 6 आठवडे आधी आणि विण्याच्या 4 ते 6 आठवडे आधी द्यावा. नरांना वर्षातून एकदा एन्टरोटॉक्सिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा डोज द्यावा

.

image3

ऐश्वर्या शेळीपालन

About Aishwarya

२०११ मध्ये जेव्हा मी हा जोडधंदा चालू केला होता तेव्हा आमच्याकडे फक्त १५ शेळ्या होत्या त्यात काही बोकड सुद्धा होते. शेळ्यांना झालेल्या करडांना मोठे करून( बोकड ) जवळील मार्केटमध्ये विकून मी सुरवात केली.

२०१२ मध्ये आणखी थोड्या मोठ्या शेळ्या खरेदी केल्या आणि त्यांच्यापासून करडांची उत्पत्ती केली. व त्या त्यांना मोठे केले व त्यातील काही बोकड जवळील मार्केट मध्ये विकून टाकले व त्यांची चागली किंमत सुद्धा मिळाली.

२०१३ मध्ये या जोडधंद्याचे रुपांतर मी धंद्यामध्ये केले आणि मी स्वत: डॉक्टर असल्यामुळे हे सुरु करण्यासाठी मला काही अडचणी आल्या नाही.

आणि आज मी एक चांगला बिजनेस करतो आणि त्यातून मला चांगला पैसा देखील मिळतो. आणि आजही लोक माझे शेळीपालन पाहण्यासाठी तसेच बोकड खरेदी करण्यासाठी येतात.

उत्पादन क्षमता टक्केवारी

२०११ मध्ये ५ %

२०१२ मध्ये १५ %

२०१३ मध्ये २७ %

२०१४ मध्ये ४८ %

२०१५ मध्ये ७० %


आम्हाला नकाशावर पहा

काही शेळी / बोकड फोटो

संपर्क साधा

मोबाईल :
+९१ ९७६६४ ५६६८२ , +९१ ९९२२३०४६६४
इमेल: [email protected]
वेबसाईट : www.aishwaryagoatfarm.com

संपर्क पत्ता :

मु. पो देवगाव ,
तालुका - आंबेगाव ,
जिल्हा - पुणे ,
४१०५०४